या देवदुताच्या मदतीने दुबईतील अनेक मृतदेह पोहचतात घरी, श्रीदेवीच्या परीवाराला ही केली मदत…

दुबईमध्ये शनिवारी मध्यरात्री श्रीदेवी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी एका मुस्लिम व्यक्तीने मदत केली होती. केरळचे रहिवाशी असलेले 44 वर्षीय अशरफ हे दुबईमध्ये राहतात. ज्यांनी श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी खूप मदत केली. अशरफ हे असे व्यक्ती आहेत जे कोणत्याही अपेक्षेविना निस्वार्थीपणे दुबईत राहणाऱ्या भारतीय लोकांची मदत करतात. श्रीदेवी यांचे सर्व कागदोपत्री प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व ठिकाणी अशरफ धमारासेरी यांचे नाव समोर येत आहे.

Loading...

44 वर्षीय अशरफ हे दुबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांसाठी एखाद्या देवदूतापेक्षा कमी नाहीयेत. कोणताही भारतीय वव्यक्ती हा दुबईमध्ये आजारी पडला किंवा जगाचा निरोप घेतला तर त्याच्या कुटुंबाची निस्वार्थीपणे सेवा करण्यास अशरफ हे तिथे हजर असतात. अनेकांना दुबईमध्ये असणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेबद्दल माहिती नसते अशावेळी अशरफ हे या सफाव गोष्टी स्वतः जबाबदारीने बघतात. मग तो एखादा मोठा सुप्रसिद्ध व्यक्ती असो किंवा एखादा गरीब मजूर व्यक्ती.

सूत्रांच्या मते अशरफ यांनी आतापर्यंत 38 देशातून जवळपास 4700 मृतदेह भारतात आणले आहेत. अशरफ यांना त्यांच्या या कार्याबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी सांगीतले की ते स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून हे सर्व करतात. श्रीदेवी यांच्या परिवारास केलेल्या मदतीबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, ‘मी कोणत्याच व्यक्तींमध्ये भेदभाव करत नाही. श्रीदेवी यांच्या पासपोर्ट संबंधीत काही अडचणी होत्या त्या सोडवायचा प्रयत्न केला.’

अशरफ हे दुबईपासून 35 किमी अंतरावर असणाऱ्या एका बेडरूम एवढ्या छोट्या फ्लॅटमध्ये आपल्या पत्नीसह राहतात. लोकांना मदत करता यावी यासाठी ते तिथे एक मेकॅनिक शॉप सुद्धा चालवतात. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

अधिक वाचा: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, बॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये प्रचंड शोककळा…
अधिक वाचा: श्रीदेवी विषयी कदाचितच तुम्हाला ह्या दहा गोष्टी माहिती असेल..
अधिक वाचा: दुबईतील लग्नात कॅमेऱ्यात कैद झाले श्रीदेवीचे शेवटचे क्षण, बघा व्हिडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *