श्रीदेवीचा मृत्यू की हत्या, अंडरवर्ल्ड मधल्या या डॉनने केली हत्या? वाचा संपूर्ण माहिती..

हिंदी सिनेजगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचा शनिवारी हार्ट अटॅकने मृत्यू झाला. एवढ्या मोठ्या सुपरस्टार अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने सर्व चाहत्यांना आणि देशवासियांना खूप मोठा धक्का बसला. सर्व चाहत्यांसाठी ही बातमी मनाला चटका लावून जाणारी ठरली. श्रीदेवी यांचे वयाच्या अवघा 54 व्या वर्षी निधन झाले. श्रीदेवी यांच्या पूर्ण परिवारावर सुद्धा त्यांच्या अचानक जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Loading...

श्रीदेवी पती बोनी कपूर आणि छोटी मुलगी खुशी हे त्यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नसमारंभासाठी दुबईला गेले होते. कोणीच विचार केला नसेल की दुबईवरून श्रीदेवी या परत कधीच वापस येणार नाहीत.

श्रीदेवी यांचा मृत्यू की हत्या?

श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहेत. श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटब मध्ये बुडून झाल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. पण आज भाजपा नेता सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे. सुब्रह्मण्यम स्वामींनी दावा केला आहे की श्रीदेवी या हार्ड ड्रिंक घेत नव्हत्या, मग अशात त्यांच्या रक्तात अल्कोहोल आढळणे संशयास्पद आहे. सुब्रमण्यम स्वामींनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने श्रीदेवी यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

54 वर्षाच्या श्रीदेवी यांचा मृत्यू शनिवारी रात्री उशिरा दुबईमध्ये झाला होता. दावा करण्यात आला होता की श्रीदेवी यांचा मृत्यू हा कार्डियक अरेस्टने झाला होता. नंतर पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार माहिती समोर आली की त्यांचा मृत्यू हा कार्डियक अरेस्टने नाही तर बाथटब मध्ये बुडून झाला आणि त्यांच्या शरीरात दारू पण आढळून आली. आता सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मात्र अनेक चर्चाना उत आला आहे.

अधिक वाचा: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, बॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये प्रचंड शोककळा…
अधिक वाचा: श्रीदेवी विषयी कदाचितच तुम्हाला ह्या दहा गोष्टी माहिती असेल..
अधिक वाचा: दुबईतील लग्नात कॅमेऱ्यात कैद झाले श्रीदेवीचे शेवटचे क्षण, बघा व्हिडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *