श्रीदेवीच्या मृत्यूचे गूढ वाढले, दुबई पोलिसांच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा…

बॉलीवूडची पहिल्या महिला सुपरस्टार श्रीदेवीचं शनिवारी मध्यरात्री दुबईमध्ये निधन झाले. श्रीदेवीच्या मृत्यूच्या वेळी त्यांचे पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी त्यांच्या सोबत होते. रिपोर्टनुसार श्रीदेवी यांचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाला. त्या दुबईमध्ये आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या.

Loading...

तिथेच त्यांना शनिवारी रात्री जवळपास 11 वाजता हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर संपूर्ण भारतात बॉलीवूडमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. त्यांची मोठी मुलगी शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने ती दुबईला जाऊ शकली नव्हती. रिपोर्टच्या मते श्रीदेवी यांना हर्टअटॅक आला तेव्हा त्या आपल्या रुममधे एकट्याच होत्या.

आज श्रीदेवी यांच्यावर मुंबईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पण त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याअगोदरच त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट आणि दुबई पोलिसांच्या स्टेटमेंटने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या मृत्युवरून अगोदरच अनेक तर्कवितर्क लावले जात होते. सर्वत्र अशीही चर्चा होती की त्यांनी चेहऱ्यावर केलेल्या खूप जास्त प्लास्टिक सर्जरीच्या शस्त्रक्रिया त्यांच्या मृत्यूचे कारण बनल्या. पन आज दुबई पोलिसांच्या स्टेटमेंटने त्यांच्या मृत्यूबद्दल शंका वाढल्या आहेत.

दुबई पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली आहे की श्रीदेवी यांचा मृत्यू हा हार्ट अटॅक किंवा कार्डियक अटॅकने झाला नसून त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला आहे. दुबई पोलिसांचे हे स्टेटमेंट सर्वत्र व्हायरल झालेले बघायला मिळत आहे. दुबई पोलीस श्रीदेवी यांच्या कुटुंबियांची सुद्धा चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, बॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये प्रचंड शोककळा…
अधिक वाचा: श्रीदेवी विषयी कदाचितच तुम्हाला ह्या दहा गोष्टी माहिती असेल..
अधिक वाचा: दुबईतील लग्नात कॅमेऱ्यात कैद झाले श्रीदेवीचे शेवटचे क्षण, बघा व्हिडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *