श्रीदेवी यांचे शेवटचे मेकअप करण्यासाठी या अभिनेत्रीने केली मेकअप आर्टिस्टला मदत…

श्रीदेवी यांच्यावर बुधवारी मुंबईतील विले पार्ले सेवा समाज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीदेवी यांना कपाळावर बिंदी आणि लिपीस्टिक खूप आवडायचे. तसेच त्यांना साऊथ इंडिअन ज्वेलरी पण खूप आवडायची. श्रीदेवी यांना निरोप देण्यासाठी लाखो चाहत्यांनी यावेळी गर्दी केली होती.

Loading...

2013 साली श्रीदेवी यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील अतुलनीय कामगिरीसाठी पद्मश्री देण्यात आला होता. यामुळे त्यांना शासकीय मानवंदना सुद्धा देण्यात आली. श्रीदेवी यांचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळण्यात आला होता. अनेकांना हा प्रश्न सुद्धा पडला होता की शासकीय मानवंदना का दिली गेली? त्यामागे हे कारण होते.

कोणी केले श्रीदेवी यांचे आवडते आणि शेवटचे मेकअप-

श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना लाल साडी आणि पारंपरिक मेकअप करण्यात आले होते. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांना एखाद्या नववधू सारखे मेकअप करण्यात आले होते. श्रीदेवी यांचे हे शेवटचे मेकअप करण्यासाठी त्यांच्या अत्यंत जवळच्या अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी मेकअप आर्टिस्टला मदत केली. श्रीदेवी आणि राणी यांचे संबंध खूप सौख्याचे होते. श्रीदेवी या राणी मुखर्जीला प्रेमाने लाडो म्हणत असत. तर राणी त्यांना माँ म्हणत असे. राणी या त्यांना प्रेरणास्थान मानत असत.

श्रीदेवी यांचे शेवटचे मेकअप त्यांचे मेकअप आर्टिस्ट अबोल पाटील आणि हेअर स्टायलिस्ट नूरजहाँ अन्सारी यांनी केले. हे मेकअप करताना राणीने त्यांना श्रीदेवी यांच्या आवडीनिवडी सांगत त्याप्रकारे मेकअप करण्यात आले. त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना बिंदी, सिंदूर, लाल लिपीस्टिक लावण्यात आले होते. तसेच रियल कनेक्शन ज्वेलरी निवडून घालण्यात आली होती.

श्रीदेवी यांना शेवटी जी साडी नेसवण्यात आली होती ती अनिल कपूर यांची पत्नी सुनीता कपूर आणि राणी मुखर्जी यांनी खरेदी केली होती.

अधिक वाचा: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, बॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये प्रचंड शोककळा…
अधिक वाचा: श्रीदेवी विषयी कदाचितच तुम्हाला ह्या दहा गोष्टी माहिती असेल..
अधिक वाचा: दुबईतील लग्नात कॅमेऱ्यात कैद झाले श्रीदेवीचे शेवटचे क्षण, बघा व्हिडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *