श्रीदेवी विषयी कदाचितच तुम्हाला ह्या दहा गोष्टी माहिती असेल..

वयाच्या चौथ्या वर्षी सिनेमाच्या पडद्यावर झळकलेली, सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळवणारी आणि नंतर बॉलिवूडची ‘हवाहवाई’ म्हणून जगभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री श्रीदेवीच्या अकाली निधनाने सिनसृष्टीवर शोककळा परसली आहे. त्यांचं जाणं सगळ्या चाहत्यांना चटका लावून जाणारंच आहे. पाच वर्षांपूर्वी ‘इंग्लिश विंग्लिश’मधून त्यांनी बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केलं होतं. या चित्रपटानं आणि त्यातील श्रीदेवींनी प्रत्येक स्त्रीच्या कोपऱ्यात घर केलंय. त्यानंतर गेल्या वर्षी ‘मॉम’ या सिनेमातून श्रीदेवी भेटल्या. सिनेमा हिट झाला नाही, पण श्रीदेवींच्या अभिनयाला सगळ्यांनीच दाद दिली होती. ‘बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका’ हे बिरूद अभिमानानं मिरवणाऱ्या श्रीदेवी शेवटपर्यंत स्टार राहिल्या आणि यापुढेही राहणार आहेत. आज खासरेवर बघूया श्रीदेवी विषयी काही खासरे गोष्टी..

Loading...

१) श्रीदेवी हि रुपेरी पडद्यावर बाल कलाकार म्हणून झळकली होती. तेव्हा तिचे वय फक्त ४ वर्ष एवढे होते. थुनायवन १६६९ या सिनेमात तिने वयाच्या चौथ्या वर्षी काम केले. २) श्रीदेवीचे खरे नाव श्री अम्मा यंगर अयप्पण हे आहे. सिनेसृष्टीत पदार्पण केल्यावर तिने नाव बदलविले. ३) श्रीदेवी आणि अनिल कपूर हि हिंदी सिनेमातील ८० ते ९० च्या दशकातील सुपर हिट जोडी होती. दोघांनी १३ सिनेमे सोबत केले आहे ज्यामध्ये काही सुपर डुपर हिट ठरले. जितेंद्र सोबत असलेल्या सिनेमात या जोडीला बघायला थियेटर मध्ये गर्दी मावत नसे त्यांनी सोबत १६ सिनेमे केले. ४) श्रीदेवीच्या संपूर्ण करीयर मध्ये तिने सर्वात जास्त सिनेमे हे कमल हसन सोबत केलेले आहे. ५) स्टीवन स्पीलबर्ग यांचा १९९३ साली आलेला जुरासिक पार्क सिनेमा श्रीदेवीला कास्ट केले होते परंतु तिला तो रोल न आवडल्याने त्या हॉलीवूड चित्रपटास तिने नकार दिला.

६) श्रीदेवीच्या सुरवातीच्या काळात तिला हिंदी बोलण्याची समस्या असल्याने तिचा आवाज डब करण्यात येत होता त्या करिता रेखा व नाझ यांनी तिच्या काही सिनेमास आवाज दिला. ७) जुदाई या सिनेमा नंतर श्रीदेवी ने चित्रपटात काम करणे बंद केले होते त्यानंतर शक्ती सिनेमात २००२ साली ती परत पदार्पण करणार होती परंतु दुसर्या मुलाची आई झाल्याने हा रोल तिने परत नाकारला. ८) १९७६ साली आलेल्या मुदुरू मुदिचू या सिनेमात तिने वयाच्या १३व्या वर्षी रजनीकांतच्या आईचा रोल केला आहे. ९) १९९२ साली आलेला बेटा सिनेमामुळे माधुरी दीक्षित ला संपूर्ण भारतात ओळख मिळाली होती परंतु हा रोल पहिले श्रीदेवीला देण्यात आला होता. शाहरुख खानचा डर सिनेमा जुही चावला चा रोल श्रीदेवीकरिता लिहलेला होता परंतु तिने या सिनेमातहि काम करण्यास नकार दिला. १०) २०१३ साली श्रीदेवी ला पद्मश्री ह्या पुरस्काराने भारत सरकार कडून सन्मानित करण्यात आले आहे.

खासरे परिवारातर्फे श्रीदेवीस भावपूर्ण श्रद्धांजली.. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Loading...